Career

10 वी ते पदवीधरांना ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी; 293 रिक्त जागांसाठी भरती | Arogya Vibhag Thane Recruitment 2024

ठाणे | आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Arogya Vibhag Thane Recruitment 2024) केली जाणार आहे. या पदभरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 293 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्स-क, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी, दंत हायजिनिस्ट, सी.एस.एस.डी. सहायक, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ मुझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर पदांची भरती केली जाणार आहे.

Arogya Vibhag Thane Recruitment 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग तज्ञMBBS MD/DNB, OBGY
बालरोग तज्ञMBBS., MD PEDIATRICS
शल्य चिकित्सकMBBS., MS
फिजिशियनMBBS., MD., MEDICINE
भुलतज्ञMBBS., MD., ANESTHESIA
नेत्र शल्य चिकित्सकMBBS., MD., OPTHALMOLOGIST
वैद्यकीय अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापिठाची वैद्यक शास्त्रातील पदवी. (एम.बी.बी.एस.)
परिचारीका/ स्टाफ नर्समहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण (H.S.C.)
प्रसाविकामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात परीक्षा उत्तीर्ण. (S.S.C.)
बायोमेडिकल इंजिनियरमान्यता प्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण (बायोमेडिकल विषयातील)
फिजियोथेरपिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी विषयातील पदवी (बी.पी.टी.एच)
डायटेशियनमान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फुड अँड न्युट्रिशन विषयासह)
ऑक्युपेशनल थेरपिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदवी.
स्पिच थेरपिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बॅचरल ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदवी.
पब्लिक हेल्थ नर्सशासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा.
मेडिकल रेकॉर्ड किपरमान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखताल पदवा (B.Sc.)
सायकॅट्रिक कौन्सिलरमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्टस (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW).
सायकॅट्रिक सोशल वर्करमान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझरDiploma in Medical Laboratory Technology or Transfusion Medicine or Blood Bank Technology after १०+२ with one year experience in the testing of blood or its components or both in licensed Blood Centre
औषध निर्माण अधिकारीफार्मसी कौन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी (बी. फार्म.)
दंत हायजिनिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठाची दंत हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी
सी.एस.एस.डी. सहायकमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेसह)
 इलेक्ट्रीशियनमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल)मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी (B.Lib.).
लायब्ररी असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
क्युरेटर ऑफ मुझियममान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी (BSc.)
आरोग्य निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी.
आर्टिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठाची फाईन आर्टस् पदवी.
फोटोग्राफरकला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक (G.D.R.)

PDF जाहिरात Arogya Vibhag Thane Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://thane.nic.in/

हेही वाचा?

Back to top button