Sunday, September 24, 2023
HomeCareerमुंबई पोलिस दलात थेट मुलाखतीव्दारे निवड | Mumbai Police Bharti 2023

मुंबई पोलिस दलात थेट मुलाखतीव्दारे निवड | Mumbai Police Bharti 2023

मुंबई | मुंबई पोलीस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Mumbai Police Bharti 2023) चांगली संधी प्राप्त झाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून रिक्त पदांची निवड मुलाखतीव्दारे करण्यात येणार आहे. 

या अधिसूचनेनुसार, ‘सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक’ पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

रिक्त जागांवर नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. मुलाखतीसाठी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा मुंबई येथे उपस्थित राहावे.

PDF जाहिरातMumbai Police Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahapolice.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular