मुंबई | मुंबई उपनगरात नोकरीच्या (Mumbai Suburban Jobs 2024) अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु अनेकांना या नोकऱ्यांविषयी माहिती नसते. हीच बाब ध्यानात घेत शासनाच्या वतीने नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी वेळोवेळी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
Mumbai Suburban Jobs 2024
यासाठी शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्याच्या नोकर भरतीसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. सध्या मुंबई उपनगरातील विविध कंपन्यासाठी अशाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 10 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
या भरती अंतर्गत सेल्स, सीएनसी ऑपरेटर, आयटीआय फिटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, इंटर्नशिप, ग्राफिक डिझायनर, मार्केटिंग, टर्नर, फिटर अशी विविध पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी 10वी, 12वी, आयटीआय पदवीधर, डिप्लोमा, बीई, बीटेक विद्यार्थी पात्र आहेत.
मेळाव्याचा पत्ता – इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बेलापूर, नवी मुंबई सेक्टर-29, अग्रोली, पी.ओ. कोकण भवन, सीबीडी-बेलापूर
जाहिरात – Mumbai Suburban Job Fair 2023
नोंदणी लिंक – https://rojgar.mahaswayam.gov.in/