Sunday, September 24, 2023
HomeCareerMPSC अंतर्गत मेगाभरती, ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु | MPSC Bharti 2023

MPSC अंतर्गत मेगाभरती, ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु | MPSC Bharti 2023

MPSC स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक जाहीर | MPSC Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

Download MPSC 2022-23 Updated September TimeTable


मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या पदभरती अंतर्गत खालील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गातील अतिविशेषीकृत पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

 PDF जाहिरातMaharashtra Public Service Commission
ऑनलाईन अर्ज कराMPSC Application 2023


MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती, नवीन जाहिराती प्रकाशित

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 266 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या पदभरती अंतर्गत ‘विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिक्षक, गट-अ’ पदाच्या एकूण 266 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 5 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ – B.E./B.Tech./B.S. आणि M.E./M.Tech./M.S. किंवा इंटिग्रेटेड एम.टेक. संबंधित शाखेत प्रथम श्रेणी किंवा समकक्ष पदवीपैकी कोणतीही एक पदवी.

विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ – पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी आणि संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी किंवा समतुल्य.
SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने.

सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा, गट-अ – बी.फार्म. आणि एम.फार्म. संबंधित स्पेशलायझेशन (प्रथम श्रेणी) किंवा दोन्ही पैकी कोणत्याही एका पदवीमध्ये समतुल्य.

PDF जाहिरात (सहायक प्राध्यापक)MPSC Examination 2023
PDF जाहिरात (सहयोगी प्राध्यापक)MPSC Examination 2023
PDF जाहिरात (सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण) MPSC Examination 2023
PDF जाहिरात (वैद्यकीय अधिक्षक)MPSC Examination 2023
ऑनलाईन अर्ज कराMPSC Application Form 2023


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३ साठी एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 2 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –  LLB, LLM
वेतनश्रेणी – एस. 14. रुपये 38600 122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

परीक्षा योजना :
परीक्षेचे टप्पे : 1 – लेखी परीक्षा
परीक्षेचे स्वरुप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नपत्रिका : 2
एकूण गुण : 200

लेखी परीक्षेची परीक्षा योजना व सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सूचना अंतर्गत केल्याप्रमाणे राहील. लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

PDF जाहिरातMPSC Civil Judge Examination 2023
ऑनलाईन अर्ज कराMPSC Sub-Ordinate Services Examination Application Form 2023
अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ, विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, संचालक, आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे. वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज 13 सप्टेंबर 2023  पासून सुरु होतील. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

PDF जाहिरातMPSC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराMPSC Application Form 2023
अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in


MPSC मेगाभरती; विविध पदांच्या संख्येत मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर तपशील | MPSC Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 8170 ऐवजी 8256 पदांची भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2023 (जाहिरात क्रमांक 001/2023) करीता दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तसेच दिनांक 28 जून 2023, 07 जुलै 2023 व दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार भरावयाच्या एकूण 8170 पदांचा समावेश करण्यात आला होता.

दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजीचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 10 ऑगस्ट 2023 तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्राद्वारे अनुक्रमे लिपिक- टंकलेखक व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरीता सुधारित पदसंख्येची मागणीपत्रे प्राप्त झाली. त्यामुळे 07 जुलै 2023 रोजीचे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सुधारित पदसंख्येचे शुद्धिपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2023 परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 8256 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेकरीता विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील सहायक कक्ष अधिकारी गट-ब तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा नियुक्ती प्राधिकारी निहाय सुधारित तपशिल आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular