Career

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत ‘लिपिक, प्रयोगशाळा सहायक, लेखापालसह विविध रिक्त पदांची भरती; 2 लाखापर्यंत पगार, त्वरित अर्ज करा | MPCB Mumbai Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध रिक्त जागांची मोठ्या प्रमाणात भरती (MPCB Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 61 रिक्त जागा भरण्यात येणार असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहेत.

या भरती अंतर्गत प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

MPCB Mumbai Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रादेशिक अधिकारीएस-२३, ६७७००-२०८७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीएस-२३, ६७७००-२०८७००
वैज्ञानिक अधिकारीएस-१९, ५५१००-१७५१००
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीएस-१५, ४१८००-१३२३००
प्रमुख लेखापालएस-१४, ३८६००-१२२८००
विधी सहायकएस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ लघुलेखकएस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहायकएस-१३, ३५४००-११२४००
वरिष्ठ लिपिकएस-०८, २५५००-८११००
प्रयोगशाळा सहायकएस-०७, २१७००-६९१००
कनिष्ठ लिपिक/टंकलेखकएस-०६, १९९००-६३२००

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज mpcb.gov.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMPCB Mumbai Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For MPCB Mumbai Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mpcb.gov.in

Back to top button