महावितरण अमरावती येथे रिक्त पदांची भरती; ऑनलाईन नोंदणी करा | MahaVitaran Amravati Bharti 2023

0
273

अमरावती | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. अमरावती ग्रामीण विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

MahaVitaran Amravati Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.

या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMahaVitaran Amravati Apprentices Notification 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For MahaVitaran Amravati Apprentices
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/