MahaPareshan Chandrapur Bharti 2024

महापारेषण चंद्रपूर अंतर्गत 30 रिक्त जागांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | MahaPareshan Chandrapur Bharti 2024

चंद्रपूर | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या रिक्त जागा भरण्यात (MahaPareshan Chandrapur Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

MahaPareshan Chandrapur Bharti 2024

शैक्षणिक पात्रता
1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

 • महत्वाची कागदपत्रे
  • एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळप्रत. 
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधारकार्ड
  • मागसवर्गीय विद्याथ्यचि जात प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  • आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMahaPareshan Chandrapur Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For MahaPareshan Chandrapur Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Scroll to Top