औरंगाबाद महापालिका अग्निशमन भरतीचा निकाल जाहीर, चेक करा | Aurangabad Mahanagarpalika Bharti Result

Share Me

औरंगाबाद | महापालिकेच्या अग्निशमन विभागातील २९ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी व शारीरिक तपासणी चाचणी परीक्षेचा निकाल (Aurangabad Mahanagarpalika Bharti Result) जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना महापालिकेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेतील १२३ पदांसाठी आयबीपीएस कंपनीमार्फत प्रक्रिया राबविण्यात आली होती. सुरवातीला अग्निशमन विभागातील २९ जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या ५५ उमेदवारांची यादी तयार करून या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीला बोलावण्यात आले होते. 

Aurangabad Mahanagarpalika Bharti Result

मंगळवारी विभागीय क्रीडा संकुलात या उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. चाचणी परीक्षेला ४१ उमेदवारांनी हजेरी लावली. या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीमध्ये मिळालेले गुण आणि ऑनलाइन लेखी परीक्षेतील गुण अशा दोन्ही परीक्षेतील गुणांची एकत्रित बेरीज करून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अग्निशमन भरती निकाल खालील लिंक वरून पहा 

 

Sr.No.  File Name PDF 1Category wise application received listEST-1_1642_dt_30_10_2023.pdf2Jahir Pragatan For exam Dated 03-01-2024,04-01-2024,05-01-2024.Jahir Pragatan3Call Letter For exam Dated 03-01-2024,04-01-2024.05-01-2024.Download4Advertisementabout_Posts.pdf5Jahir PragatanJahir_pragatan.pdf6Result of Leading Fireman ExamResult_of_Leading_Fireman.pdf7Result of Fireman ExamResult_of_Fireman_Exam.pdf8Regarding Physical Qualification Verification Test for the posts of Firefighters and Chief FirefightersEST_212_dt_31_01_2024.pdf


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण ११४ पदे भरण्याबाबतची जाहिरात जा. क्र. मनपा/आस्था-१/२०२३/१२३४, दि. १८/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदाची लेखी परीक्षा दि. ०९/१२/२०२३ रोजी घेण्यात आली होती.

सदर पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेले गुण या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची यादी ही निवड यादी नसून फक्त उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची माहिती दर्शविलेली आहे. खालील लिंक वर PDF यादी आपण बघू शकता. 

तसेच अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदासाठीच्या पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून शारीरिक पात्रता पडताळणी परीक्षा (लेखी परीक्षेकरिता विहित केलेले किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील.) घेण्यात येणार असून याबाबत सविस्तर माहिती, सूचना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारे लवकरच  प्रसिद्ध करण्यात येईल. 

1Result of Leading Fireman ExamResult_of_Leading_Fireman.pdf
2Result of Fireman ExamResult_of_Fireman_Exam.pdf

Share Me