मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी जिओमध्ये करिअरची (Jio Career) संधी मिळत आहे. जिओने तरुणांसाठी फ्रीलान्स वर्कची संधी (Jio Recruitment 2023) उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी विना अनुभवी, नवशिक्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच ऑफिस वर्कच्या देखील अनेक संधी याठिकाणी उपलब्ध आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना या नोकरीसाठी 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकता. अर्ज कसा करायचा, तसेच याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे याची माहिती जाणून घेऊया..
जिओसोबत फ्रीलान्स करिअर
- Jio Career वर फ्रीलान्सर जॉबसाठी अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
- सर्वात अगोदर Jio Career चे संकेतस्थळ https://careers.jio.com/ वर जा
- यानंतर फ्रीलान्सर हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करा. याठिकाणी अनेक जॉबचे पर्याय मिळतील
- तुमच्या आवडीची नोकरी निवडा
- त्यानंतर नोकरीची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्यावर क्लिक करा
- नोकरीसाठी अर्ज करा, या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा रिझ्युम आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- आता सबमिट बटणावर क्लिक करा
Jio मध्ये तुमच्या गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही नोकरी शोधू शकता. तुम्ही 10 वी पास असाल अथवा पदवीधर असाल तरी देखील तुमच्यासाठी नोकरी उपलब्ध आहे. तुमचा अर्ज Jio Career टीम द्वारा तपासण्यात येईल. तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला ईमेल व्दारे कळवण्यात येईल. त्यानंतर पुढील प्रक्रियेची माहिती देण्यात येईल.
Jio मध्ये नोकरी मिळवण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात
- Jio Career मध्ये फ्रीलान्सर जॉबसाठी अर्ज करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
- तुमचा रिझ्यूम अपडेट ठेवा.
- वाक्यरचनेतील चूका सुधारा.
- कागदपत्रे अपलोड करताना ती स्पष्ट दिसतील अशी असावीत.
- तुमचा अर्ज पॉवर पाईंट्सच्या मदतीने हायलाईट करा.
- रिक्त पदासाठी तुम्ही योग्य उमेदवार आहात या रिझ्यूममधून जाणवून द्या.
- निवड झाल्यानंतर तुमच्या कामावर तुमचा पगार अवलंबून आहे.
- चांगले काम केल्यास चांगल्या पगाराची संधी मिळेल.
- जितके दिवस काम कराल, तितका पगार जमा होईल.