Tuesday, September 26, 2023
HomeCareer10 वी, ITI उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात 362 जागांसाठी भरती |...

10 वी, ITI उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात 362 जागांसाठी भरती | Indian Navy Bharti 2023

मुंबई | भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी आहे. भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे. दहावी आणि आयआयटी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Indian Navy Bharti 2023 – या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत एकूण 362 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड झालेनंतर त्यांना भारतभरात कुठेही नोकरी करण्याची तयारी ठेवावी लागेल.

शैक्षणिक पात्रता – 10वी आणि आयटीआय पास उमेदवारांना या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

रिक्त पदांमध्ये आयआयटीच्या विविध ट्रेड साठी जागा रिक्त आहेत, त्याचे तपशील अर्जात दिलेले आहेत. अद्याप या भरतीचे अर्ज उपलब्ध झालेले नाहीत, येत्या 26 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज करण्यासाठी अंदमान निकोबार शासनाच्या या https://www.andaman.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

PDF जाहिरात – Indian Naval Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (26 ऑगस्ट 2023पासून) – Online Application
अधिकृत वेबसाईटwww.joinindiannavy.gov.in

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. या अर्जप्रक्रियेतून पात्र उमेदवारांची 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा प्रत्यक्ष स्वरूपात होणार असून त्याचे तपशिल वरील लिंक मध्ये दिलेले आहेत. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular