Wednesday, February 28, 2024
HomeCareerअर्ज करण्याची शेवटची संधी : 10 वी ते पदवीधरांना भारतीय सैन्य दलात...

अर्ज करण्याची शेवटची संधी : 10 वी ते पदवीधरांना भारतीय सैन्य दलात नोकरी, त्वरित अर्ज करा | Indian Army Recruitment 2023

मुंबई | भारतीय सैन्यदल (Indian Army) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. याठिकाणी CSBO, कुक, S/वाला,  मेसेंजर, वॉशरमन, चौकीदार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मध्य भारत एरिया सिग्नल कंपनी, PIN-901124, Clo 56 APO

पदाचे नाववेतनश्रेणी
CSBORs 21700/-+Allowances (Level 3, Cell-1)
कुकRs 19900-63200
S/वालाRs 18000-56900
मेसेंजरRs 18000-58900
वॉशरमनRs 18000-56900
चौकीदारRs 18000-56900

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. वरील पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत अविवाहित पुरुष /महिला) कायदा पदवीधर पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – एलएलबी पदवी (पदवीनंतर तीन वर्षे व्यावसायिक किंवा 10 प्लस 2 नंतर पाच वर्षे) परीक्षेत किमान 55% एकूण गुण. याव्यतिरिक्त, CLAT PG 2023 स्कोअर सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे (LLM पात्र आणि LLM उपस्थित उमेदवारांसह) जे विशिष्ट वर्षापासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात. उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असावेत. उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठातील असावा.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून आर करावे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा. पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातIndian Army Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://indianarmy.nic.in/


भारतीय सैन्य दलात तब्बल 1 लाख 10 हजार पदांची भरती, तरूणांनो संधी सोडू नका | Indian Army Recruitment 2023

मुंबई | भारतीय सैन्य दलात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. संरक्षण दलाच्या वेगवेगळ्या गटात तब्बल एक लाख 10 हजार पदांची मेगाभरती (Indian Army Recruitment 2023) करण्यात येणार आहे. 18 ते 23 वयोगटातील तरुणांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

Indian Army Recruitment 2023

देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठे असले तरी, नोकरी शोधणाऱ्यांना नोकऱ्यांची कमतरता नाही. संरक्षण दलातील नोकऱ्या व तयारी याबाबत विदर्भात जनजागृती करणाऱ्या ‘लाइफ स्किल फाउंडेशन’च्या अध्यक्षा डॉ. राजेश्वरी वानखडे यांनी संरक्षण दलाच्या वेबसाइटच्या आधारे मेगाभरतीची माहिती दिली.

‘एसएससी जीडी’ या पदाच्या 84,866 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. तर सीआरपीएफ कॉन्सटेबल पदाच्या 30 हजार जागांची भरती घेण्यात येणार आहे. 24 नोव्हेंबर पासून या दोन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, 28 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत आहे.

इच्छूक आणि पात्र विद्यार्थी या दोन्ही गटांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान या पदांच्या परीक्षा होणार आहेत. या दोन्ही पदांसाठी मुला- मुलींची उंची व शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयाची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. निवड झालेल्या उमेदवाराला 40 ते 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.

जनजागृतीसाठी फाउंडेशनचे प्रयत्न

लाइफ स्किल फाउंडेशन च्या माध्यमातून विदर्भात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात संस्थेने जनजागृती मोहीम राबविली. विदर्भात आतापर्यंत 70 ठिकाणी शिबिरे घेऊन संरक्षण दलातील करिअरची माहिती दिली. संरक्षणाच्या तिन्ही दलांतील अनेक निवृत्त व कार्यरत अधिकारी या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील युवकांना प्रेरणा देत आहेत.

संरक्षण क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध होतात. दरवर्षी दोन वेळा भरती होते. मात्र, संरक्षण दलाच्या करिअरबाबत जनजागृतीचा अभाव विदर्भात बघायला मिळतो. संरक्षण क्षेत्रात अधिकारी पदासाठी 18 ते 23 वयोगटाचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. एनडीएसारख्या परीक्षा महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थी व पालकांनी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे व देशाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे.

RELATED ARTICLES

Most Popular