AgricultureWeather

IMD Rain Alert | हवेतील गारठा वाढला; थंडीसोबत येत्या 48 तासांत ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई | पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून येत्या 48 तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD Rain Alert) वर्तवला आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

देशातून मान्सून पूर्णपणे परतला असला, तरी अजूनही तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत अंदमान-निकोबार बेट, केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील 7 दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हलक्या (Rain News) ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडेल, असा इशारा IMD कडून देण्यात आला आहे.

स्कायमेट या खाजगी संस्थेच्या हवामान अंदाजानुसार, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर येत्या 4-5 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे.

Back to top button