मुंबई | गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD Rain Alert) अंदाजानुसार, पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. राज्यासह देशभरात पावसाचा अंदाज आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
IMD Rain Alert – Weather forecast 2023
राज्यासह देशभरात गारठा वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असला तरी सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी जाणवत आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
राज्यात काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण किनारपट्टी भागात सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असं हवामान पाहायला मिळत आहे. मुंबई आणि ठाणे या ठिकाणीही तापमान वाढ कायम आहे. सकाळी हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे.
केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज 6 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तमिळनाडू आणि केरळ आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस नोंदवला गेला आहे.