IIT बॉम्बेच्या 85 विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये मिळालं 1 कोटीहून अधिकचं पॅकेज, जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात आहेत इतक्या पगाराच्या संधी | IIT Bombay Placements

0
159

मुंबई | आयआयटी बॉम्बे जगातील नामांकित शैक्षणिक संस्थापैकी एक असून यंदाही येथील विद्यार्थांनी प्लेसमेंट सीझनमध्ये बाजी मारली आहे. येथील तब्बल ८५ विद्यार्थां असे आहेत ज्याना २०२३-२४ च्या फेज एकमध्ये एक कोटींहून अधिक सीटीसी पॅकेज असलेल्या जॉबच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. इतकेच नाही तर येथे २० डिसेंबर पर्यंत तब्बल १,३४० ऑफर्स देण्यात आल्या असून या माध्यमातून १,१८८ विद्यार्थांना नोकरी देखील मिळाली आहे.

IIT Bombay Placements

यंदा २,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी रजिस्ट्रेशन केले होते, ज्यापैकी ६० टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात जॉब ऑफर मिळाल्या आहेत. दुसरा टप्पा या महिन्याच्या शेवटी पार पडणार आहे. यावेळी सर्वाधिक सॅलरी ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्पेसमध्ये देण्यात आली आहे. या वर्षी सरासरी वर्षिक पगार हा ३६.९ लाख इतका मिळाला जो मागच्या वर्षी ३२.२५ लाख इतका होता.

या वर्षी जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर, हाँगकाँग येथील एकूण ६३ इंटरनॅशनल कंपन्यांनी जॉब ऑफर्स दिले आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीने दिलेली सर्वाधिक सॅलरी २९ लाख हाँगकाँग डॉलर (जवळपास ३ कोटी रुपये) वार्षिक इतकी आहे. तर सरासरी सॅलरी २४.०२ लाख रुपये वार्षिक इतकी आहे. इंजिनियरिंग आणि प्राद्योगिकी साठी सरासरी पॅकेज २१.८८ लाख रुपये, आयटी आणि सॉफ्टवेअर २६.३५ लाख रुपये, फायनान्ससाठी ३२.३८ लाख रुपये, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी ६.९४ लाख रुपये होतं.

यापूर्वी आयआयटी मुंबईच्या २०२२-२३ बॅचमधील एका ग्रॅज्युएटला एका विदेशी कंपनीने ३.६७ कोटी वर्षासाठी सॅलरी जॉब ऑफर देण्यात आली होती. इंस्टीट्यूटने सांगितले की आतापर्यंत सर्वाधिक ऑफर इंटरनॅशनल कंपनीकडून आले आहेत. याखेरीज एका विद्यार्थ्याला भारतातील कंपनीकडून वार्षिक एक कोटीचं पॅकेज मिळालं आहे.