Home Guard Bharti 2024

खुशखबर: 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; 10,285 होमगार्ड पदांची मेगा भरती | Home Guard Bharti 2024

नवी दिल्ली | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. होम गार्ड महानिर्देशक अंतर्गत होमगार्ड पदांसाठी मेगाभरतीची (Home Guard Bharti 2024) घोषणा झाली आहे. या मेगाभरती अंतर्गत एकूण 10,285 होमगार्ड पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. या पदांसाठी 12वी पास (वरिष्ठ माध्यमिक) /(माजी सैनिक/माजी CAPF कर्मचार्‍यांसाठी 10वी उत्तीर्ण ही पात्रता आहे.

Home Guard Bharti 2024

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, उमेदवाराला तीन वर्षांसाठीच ही नोकरी करता येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 45 दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट देखील द्यावी लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :
– वैध पासपोर्ट
– निवडणूक आयोगाचे फोटो I कार्ड
– नाव आणि छायाचित्र असलेले वर्तमान आणि वैध शिधापत्रिका. शिधापत्रिका नसल्यास उमेदवाराचा फोटो, त्याला दुसर्‍या ओळखीचा पुरावा बेअरिंगद्वारे समर्थित करणे आवश्यक आहे अर्जदाराचे छायाचित्र.
– वाहतूक विभाग GNCT दिल्ली द्वारे जारी केलेला वैध ड्रायव्हिंग परवाना.
– सार्वजनिक क्षेत्रातील बँक खात्याचे रहिवासी असलेले छायाचित्र असलेले प्रमाणित पासबुक
– महसूल विभागाच्या सक्षम/अधिकृत सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र

PDF जाहिरात – Home Guard Bharti 2024 (English)
PDF जाहिरात – Home Guard Bharti 2024 (हिंदी)
ऑनलाईन अर्ज करा – Apply for Home Guard Bharti 2024

Scroll to Top