गोवा लोकसेवा आयोग नोकर भरतीची जाहिरात आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे काम सुरू | GPSC Goa Bharti 2024

0
213

पणजी | गोवा कर्मचारी भरती आयोगाने विविध खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी (GPSC Goa Bharti 2024) युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. विविध खात्यांतील रिक्त पदांची संख्या खाते प्रमुखांकडून मागवण्यात आली असून त्या यादींची छाननी आयोगाने सुरू केलेली आहे. कर्मचारी भरती आयोगाचे सचिव शशांक ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करून सरकारी नोकरीची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दि. ८ जानेवारी २०२२ पर्यंत ज्या सरकारी खात्यांकडून नोकर भरतीच्या (GPSC Goa Bharti 2024) जाहिराती झाल्या होत्या, त्या खात्यात नोकरभरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी भरती आयोगाने नोकरभरतीची तयारी सुरू केली. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आयोगाकडून पहिली जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार ३१ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करून नोकरभरती संदर्भातील पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे काम आयोगाने सुरू केलेले आहे. 

सरकारी खात्यांतील ‘क’ श्रेणीतील पदे यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत. विविध सरकारी खात्यांनी आपल्याकडील रिक्त पदांची यादी कर्मचारी भरती आयोगाला पाठवली आहे. त्या पदांच्या छाननीचे काम आयोगाने सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात किती पदे भरायची याचा निर्णय आयोग सरकारशी चर्चा करून घेणार आहे व त्यानंतर लगेच जाहिरात प्रसिद्ध करणार आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.