Career

10 वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी; 26 हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती.. वेळ न दवडता अर्ज करा | Government Job 2023

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job 2023) असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 26,000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून ही या वर्षातील मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे.

CRPF, BSF, CISF, ITBP या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ssc.nic.in या साईटवर जाऊन अर्ज भरावे लागतील. याच साईटवर या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळेल.

ही भरती प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज 31 डिसेंबर 2023 पर्यंत आरामात करू शकता, तर 1 जानेवारी 2024 पर्यंत आपण फी भरू शकता. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 23 असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फी आहे. इच्छुकांनी उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी अर्ज करावेत.

Back to top button