‘पनौती’ शब्दावरून राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस; दोन दिवसात द्यावे लागणार उत्तर | Rahul Gandhi Vs PM Narendra Modi

0
222

मुंबई | राजस्थान येथे निवडणूक प्रचारादरम्यान खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी थेट नाव घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. अप्रत्यक्षरित्या त्यांचा उल्लेख ‘पनौती’ आणि पाकिटमार असा केला होता. त्यामुळे मोदींबाबत उच्चारलेल्या या दोन शब्दांच्या बाबत आता खुलासा करण्यासाठी राहुल गांधींना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे. नोटीसीला उत्तर देण्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे. दरम्यान वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याच्या पराभवावर बोलताना त्यांनी ‘पनौती’ शब्दाचा उल्लेख केला होता. तसेच राहूल गांधीनी टीका करण्यापूर्वीच सर्व सोशल मिडीयावर नरेंद्र मोदींना उद्देशून पनौती शब्द ट्रेंड करत होता.

नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट्सने हरवले. पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करूनसुद्धा अंतिम सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेला हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. त्यावरूनच राहुल गांधी यांनी टीका केली होती.

राहुल गांधी म्हणाले की, हा पनौती, पनौती, ते सामना पाहायला गेले आणि भारतीय संघ हरला. आपला संघ चांगली कामगिरी करत होता, पण पनौती तिकडे गेली आणि भारतीय संघाला हरवले. राहुल गांधींच्या या टीकेला भाजपकडून देखील उत्तर देण्यात आले होते. परंतु आता निवडणूक आयोगाने राहूल गांधीनी पंतप्रधांनावर केलेल्या टिकेची दखल घेतली असून या नोटीशीवर राहूल गांधी काय उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.