DU Recruitment 2024

शिक्षकेतर पदांसाठी भरती सुरू, 17 फेब्रुवारीपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर | DU Recruitment 2024

मुंबई | दिल्ली विद्यापीठात नोकरी मिळवण्याची चांगली संधी (DU Recruitment 2024) निर्माण झाली आहे. येथे, अनेक शिक्षकेतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीचे तपशील जाणून घेऊया..

दिल्ली विद्यापीठातील या भरती मोहिमेद्वारे एकूण 36 शिक्षकेतर पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया चालू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2024 आहे.

रिक्त पदांच्या तपशीलांबद्दल सांगायचे झाल्यास, या 36 पदांपैकी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकाची 3 पदे, तांत्रिक सहाय्यकाची 6 पदे, प्रयोगशाळा सहाय्यकाची 12 पदे आणि प्रयोगशाळा परिचराची 15 पदे समाविष्ट आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. याबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया – या पदांवरील निवड दोन टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल. प्रथम लेखी परीक्षा होईल आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.

परिक्षा पध्दती – लेखी परीक्षा दोन तास आणि 400 गुणांची असेल. सर्व प्रश्न चार गुणांचे असतील आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. तर कौशल्य चाचणी एक तासाची असेल ज्यामध्ये 100 गुणांचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये वर्णनात्मक, MCQ आधारित प्रश्न आणि प्रात्यक्षिक चाचणीचा समावेश असेल.

अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. OBC, EWS आणि महिला उमेदवारांना 800 रुपये शुल्क भरावे लागेल आणि SC, ST, PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये शुल्क भरावे लागेल.

अर्ज करण्यासाठी, सूचना पाहा आणि या पदांचे तपशील जाणून घ्या, तुम्ही दिल्ली विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. हे करण्यासाठी, DU च्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता आहे – du.ac.in. तसेच For any queries please email to non_teaching_rec@admin.du.ac.in

Scroll to Top