पुणे | महाराष्ट्रातील प्रख्यात विद्यापीठांपैकी एक असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे भरती (D. Y. Patil Vidyapeeth Bharti 2023) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध संवर्गातील एकूण २० पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये वित्त अधिकारी, कायदा अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहाय्यक प्रोग्रामर, विभाग अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक या पदांचा समावेश आहे.
याबाबत डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन ईमेल द्वारे तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करायचा असून २४ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पात्रता:
वित्त अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह वाणिज्य शाखेतील (Commerce) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी
कायदा अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ‘एलएलएम’ किंवा ‘एलएलबी’ पदवी उत्तीर्ण असावी.
सहाय्यक निबंधक – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
सहाय्यक प्रोग्रामर – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह अभियांत्रिकी आणि एमसीएस पदवी (B. E. (Computer) / B.E. (IT) / MCA)
विभाग अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
वरिष्ठ सहाय्यक – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
सहाय्यक – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ईमेल) द्वारे आणि ऑफलाइन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्यासाठी ईमेल पत्ता: career@dpu.edu.in
अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवण्यासाठी पत्ता: कुलसचिव, डीवाय पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे ४११०१८.
अधिकृत वेबसाईट – https://dpu.edu.in/
PDF जाहिरात – DYP University Recruitment 2023
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.