मुंबई | कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (CSIR Recruitment 2023-24) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदांच्या एकूण 444 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
वरील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
CSIR Recruitment 2023-24
शैक्षणिक पात्रता – वरील रिक्त पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे, ओबीसी – 3 वर्षे सूट, मागासवर्गीय – 5 वर्षे सूट.
अर्ज फी – खुला/ ओबीसी/ EWS – 500 रुपये, मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwD – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
पदाचे नाव | पद संख्या |
विभाग अधिकारी | 76 पदे |
सहायक विभाग अधिकारी | 378 पदे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विभाग अधिकारी | Group B (Gazetted) Pay Level – 8, Cell – 1 (Rs. 47,600 –Rs. 1,51,100) |
सहायक विभाग अधिकारी | Group B (Non-Gazetted) Pay Level – 7, Cell – 1 (Rs. 44,900 –1,42,400) |
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 8 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024
PDF जाहिरात – CSIR Recruitment 2023-24
अधिकृत वेबसाईट – https://www.csir.res.in/