मुंबई | कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांची भरती (Cochin Shipyard Bharti 2024) केली जाणार आहे. याची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून सहायक अभियंता, सहायक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड म्हणजेच CSL ने वरील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. वरील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे असून इच्छूक उमेदवारांना अर्ज करताना 400 रूपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
सहायक अभियंता – राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा माजी सैनिकांच्या बाबतीत समकक्ष पात्रता.
सहायक प्रशासकीय अधिकारी – कला/विज्ञान/वाणिज्य विषयातील पदवी किंवा राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून किमान ६०% गुण मिळवून तीन वर्षांचा व्यावसायिक सराव/संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान या विषयातील डिप्लोमा उत्तीर्ण
लेखापाल – M.Com सह पदवीधर आणि सरकारी आस्थापनेमधील वित्त / लेखा या विषयातील सात वर्षांचा अनुभव / सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रम CA/CMA इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असलेले पदवीधर, वित्त / सरकारी आस्थापनेमधील लेखा पदाच्या पाच वर्षांच्या पात्रता अनुभवासह किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रम.
पगार : ₹28000-3%-110000.
PDF जाहिरात – Cochin Shipyard Notification 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Cochin Shipyard Notification 2024
अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com
अर्जदारांनी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन (Career) टॅबमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य असेल. अर्जामध्ये नोंदणी आणि अर्ज सादर करणे (Registration and Submission of application) या दोन महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश आहे.
अर्जदारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. अर्ज एकदा सबमिट केलेला अर्ज अंतिम असेल. ऑनलाइन अर्जातील सर्व नोंदी बरोबर असल्याची खात्री करावी त्यानंतरच अर्ज सबमीट करावे. अर्जामधील माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास सदर अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पातळीवर नाकारले जातील. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, अर्जदारांनी सॉफ्ट कॉपी/प्रिंटआउट स्वतःकडे ठेवावी.
मुंबई | कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Cochin Shipyard Bharti 2023) अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. याठिकाणी पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Cochin Shipyard Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर प्रशिक्षणार्थी – मान्यताप्राप्त विद्यापिठाची अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार – राज्य सरकारने संबंधित विषयात स्थापन केलेल्या राज्य परिषद किंवा तंत्रशिक्षण मंडळाने मंजूर केलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा.
PDF जाहिरात – Cochin Shipyard Notification 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Cochin Shipyard Notification 2023
अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com