Career

महिन्याला लाखो रूपये कमवून देणारं ग्राफिक डिझायनिंगचं क्षेत्र खुणावतयं? मग.. जाणून घ्या सविस्तर | Career in Graphic Designing

गेल्या काही वर्षांमध्ये ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. बदललेले तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हीटी यामुळे या क्षेत्रात अनेक छोटे-मोठे कोर्सेस सूरू झाले आहेत. जगभरातील अनेक कंपन्या आता छोट्या-मोठ्या क्रिएटिव्हीटीसाठी देखील ग्राफिक डिझायनर्सची नियुक्ती करतात. त्यामुळे, या क्षेत्रामध्ये करिअरच्या (Career in Graphic Designing) मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. आधी आपण या क्षेत्रातील करिअरच्या संधी जाणून घेऊ..

ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी

ग्राफिक डिझायनिंग ही एक कला आणि तंत्रज्ञानाची संकल्पना आहे जी व्हिज्युअल कम्युनिकेशनसाठी वापरली जाते. ग्राफिक डिझायनर्स विविध प्रकारचे दृश्य संदेश तयार करतात, जसे की लोगो, पोस्टर्स, वेब डिझाइन, विज्ञाने आणि पुस्तके. ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या काही संधी खालीलप्रमाणे आहेत:

Career in Graphic Designing

  • जाहिरात एजन्सी: जाहिरात एजन्सींमध्ये ग्राफिक डिझायनर्स विविध प्रकारच्या जाहिराती, जसे की टेलिव्हिजन जाहिराती, रेडिओ जाहिराती, प्रिंट जाहिराती आणि डिजिटल जाहिराती तयार करतात.
  • संपादकीय डिझाइन: संपादकीय डिझाइनमध्ये मासिके, वृत्तपत्रे आणि पुस्तके यासारख्या प्रकाशनांसाठी डिझाइन तयार केली जातात, यासाठी ग्राफिक डिझायनरची गरज भासते.
  • वेब डिझाइन: वेब डिझाइनमध्ये वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्स तयार करणे याचा समावेश आहे.
  • ग्राफिक्स डिझाइन: ग्राफिक डिझाइनमध्ये लोगो, पोस्टर्स, लेबल आणि इतर व्हिज्युअल सामग्री तयार करणेसाठी ग्राफिक डिझायनरची गरज भासते. .
  • इंटरफेस डिझाइन: इंटरफेस डिझाइनमध्ये संगणक आणि मोबाइल डिव्हाइसेससाठी वापरकर्ता इंटरफेस तयार करावा लागतो. हे काम ग्राफिक डिझायनरची अतिशय चांगल्या प्रकारे करतात, त्यामुळे ग्राफिक डिझायनरची गरज भासते.

ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी, तुम्हाला योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तुम्ही कला महाविद्यालयातून ग्राफिक डिझाइनची पदवी किंवा डिप्लोमा मिळवू शकता. तुम्ही ऑनलाइन किंवा ग्राफिक डिझाइनच्या विविध कोर्सेसमध्ये देखील नोंदणी करू शकता. मात्र, या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ कोर्स कोणते आहेत? जे ट्रेडिंग आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊया..

मोशन ग्राफिक डिझायनर

मोशन ग्राफिक डिझायनर व्हिडिओ आणि चित्रपटांसाठी अ‍ॅनिमेटेड ग्राफिक्स तयार करण्याचे काम करतात. यासोबतच ते व्हिज्युएल इफेक्ट्स देखील क्रिएट करतात. त्यांच्या या कौशल्याचा सर्वाधिक वापर हा चित्रपट आणि अ‍ॅनिमेटेड मूव्हिज, डॉक्युमेंटरी आणि जाहिरातींसाठी केला जातो. यासाठी विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर टूल्सची मदत घेतली जाते. भारतात या पदाचा सरासरी पगार वर्षाला 4.5 लाख रूपये आहे.

वेब डिझायनर

वेब डिझायनरचे काम हे वेबसाईट डिझाईन करण्याचे असते. हा कोर्स करताना विविध प्रकारचे स्किल्स शिकवले जातात. ज्यामध्ये, टेंम्प्लेट डिझायनिंग, लोगो डिझायनिंग, थ्रिडी आणि टूडी अ‍ॅनिमेशनसह, फ्लॅशिंग, बॅनर डिझायनिंग आणि ग्राफिक डिझायनिंगसह वेबसाईट मेंटेनंन्स इत्यादी स्किल्स शिकवल्या जातात. भारतातील एंट्री लेव्हल वेब डिझायनरचा सरासरी पगार हा वर्षाला ३.५ लाख रूपये आहे.

क्रिएटिव्ह डायरेक्टर

डिझाईन टीमचा प्रमुख म्हणून क्रिएटिव्ह डायरेक्टर काम करतो. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागते. एखाद्या प्रोजेक्टचे, चित्रपटाचे किंवा जाहिरातीच्या क्रिएटिव्ह प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि दिग्दर्शन करण्याची प्रमुख जबाबदारी क्रिएटिव्ह डायरेक्टरची असते. या कोर्समध्ये तुम्हाला डिझायनिंगचे विविध सॉफ्टवेअर्स आणि विविध प्रकारचे टूल्स शिकवले जातात. हा कोर्स सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. या कोर्सला भरपूर डिमांड आहे. भारतातील क्रिएटिव्ह डायरेक्टरच्या पगाराचे पॅकेज हे वर्षाला सुमारे २५ लाख रूपये आहे.

ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी, तुम्हाला खालील कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे

  • कला आणि डिझाइन कौशल्ये: तुम्हाला कला आणि डिझाइनच्या मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे फोटोशॉप, इलस्ट्रेटर आणि इतर डिझाइन सॉफ्टवेअर वापरण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
  • संप्रेषण कौशल्ये: तुम्ही तुमच्या डिझाइन्सचे स्पष्ट आणि प्रभावीपणे संप्रेषण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
  • समस्या सोडवणे: तुम्ही ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यास आणि त्यानुसार डिझाइन तयार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
  • कल्पनाशक्ती : तुम्ही नवीन कल्पना आणि संकल्पना विकसित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात करिअर करणे ही एक रोमांचक आणि उत्कृष्ट संधी आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला कला आणि डिझाइनची आवड असणे आवश्यक आहे. तुम्ही जर या क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन तुमची कौशल्ये विकसित करा आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा.

Back to top button