राज्यात आणखी 20 हजार शिक्षकांची भरती; शिक्षण खात्याचा मोठा निर्णय | Belgaum Teacher Recruitment 2023

Share Me

बेळगाव | कर्नाटक राज्याच्या शिक्षण खात्याने (Education Department) आणखी 20 हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे डीएड आणि बीएड्धारकांना (D.Ed and B.Ed) रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात 13,500 शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये अद्याप शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे कल वाढेल, असे मत व्यक्त होत आहे. दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरीही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरती होण्यास अडचण होत आहे, मात्र दरवर्षी शिक्षक भरती झाली तर डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

शिक्षक भरतीस होत असलेला विलंब, तसेच विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकारच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील 90 टक्‍के विनाअनुदानित डीएड महाविद्यालये बंद झाली आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात एकूण 84 डीएड महाविद्यालये होती व विद्यार्थी अधिक प्रमाणात होते.

मात्र, अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम डीएड महाविद्यालयांवर झाला आहे, मात्र 13500 शिक्षकांच्या भरतीनंतर पुन्हा 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याने डीएड व बीएड महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.


Share Me