Sunday, September 24, 2023
HomeCareerमुदतवाढ : 10 वी ते पदवीधरांसाठी आरोग्य विभागात 10 हजार 949 रिक्त...

मुदतवाढ : 10 वी ते पदवीधरांसाठी आरोग्य विभागात 10 हजार 949 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2023

मुंबई | आरोग्य विभागाच्या रखडलेल्या 10 हजार 949 पदांसाठीची जाहिरात मंगळवार 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द झाली आहे. या भरती अंतर्गत  गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. 

या भरती अंतर्गत  गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजलेपासून सुरु होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 22 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदसंख्या – एकूण 10,949 पदे
    • आरोग्य विभाग – गट क : 6939 पदे
    • आरोग्य विभाग – गट ड : 4010 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://cdn.digialm.com/
PDF ग्रुप C जाहिरात Arogya Vibhag Bharti Group C – 2023
PDF ग्रुप D जाहिरात Arogya Vibhag Bharti Group D – 2023

या पदभरतीसाठी अर्ज शुल्क –

  • सर्वसाधारण खुला प्रवर्ग: रु. 1000
  • मागासप्रवर्ग: रु. 900
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.

राज्यातील विविध ठिकाणच्या आरोग्य विभागाच्या प्रसिध्द झालेल्या जाहिराती खालीलप्रमाणे


राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातले असून आता भरती प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघणार आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.

’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular