नाशिक | वन विभागाचे वतीने लेखापाल (नाशिक) पदाच्या घेण्यात आलेल्या भरती परिक्षेच्या निकालाचे Selection आणि waiting लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी 30 दिवसात जॉईन करणे गरजेचे आहे, अन्यथा waiting List मध्ये असलेल्या उमेदवारांना बोलवण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Van Vibhag Bharti Result 2023
वनविभागातील लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या पाच राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल, सर्वेक्षक व वनरक्षक या ३ प्रादेशिकस्तरीय संवर्गांकरिता एकूण २४१७ पदांची जाहिरात दिनांक ८ /६/२०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. वनविभागाची भरती प्रक्रिया ही टी.सी. एस. आय.ओ.एन. या कंपनीमार्फत राबविण्यात येत असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध १२९ केंद्रांवर दिनांक ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घेण्यात आली. वनरक्षक वगळता इतर पदांच्या परीक्षेचा निकाल दिनांक २२/११/२०२३ रोजी वनविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल व सर्वेक्षक संवर्गाची कागदपत्रे तपासणीकरिता उमेदवारांची यादी वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक २८/१२/२०२३ ते ६/१/२०२४ या दरम्यान कागदपत्रे तपासणीची कार्यवाही वनवृत्त स्तरावर सुरू करण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी.