अनेकांना आहारात तिखट पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात तिखट मिरच्यांबद्दल (Spicy Chilli in World) माहिती सांगणार आहोत. या मिरच्या खाल्ल्याने अनेकदा चांगल्या माणसाचीही प्रकृती बिघडू शकते. इतक्या या मिरच्या तिखट असतात. चला तर जाणून घेऊया जगातील सर्वात तिखट मिरच्यांबद्दल…
Spicy Chilli in World
ड्रेगन्स ब्रेथ
ड्रॅगन ब्रेथ मिरची खूप तिखट आहे. ही मिरची जितकी तिखट तितकी चांगली. ही मिरची मुख्यतः औषधे बनवण्यासाठी वापरली जाते. ही मिरची युनायटेड किंगडममध्ये आढळते. ड्रॅगन ब्रेथ मिरचीला जगातील सर्वात तिखट मिरची म्हटले जाते. या मिरचीचा तिखटपणा 2.48 दशलक्ष स्कॉविले युनिट्सपर्यंत आहे. जे कॅरोलिना मिरचीपेक्षा 2.2 दशलक्ष जास्त आहे.
भूत जोलकियाइस
भूत जोलकियाइस ही मिरची भारतातील सर्वात तिखट मिरची आहे. या मिरचीचे उत्पादन ईशान्येत घेतले जाते. 2007 पासून या मिरचीला जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखले जाते. या मिरचीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आले आहे. भूत जोलकियाइस मिरची इतकी तिखट आहे की, त्याला भुताची मिरची असेही म्हणतात. आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेशात या मिरचीची लागवड केली जाते.
कैरोलिना रीपर
कॅरोलिना रीपर ही मिरची देखील खूप तिखट आहे. 2013 मध्ये, तिखटपणाच्या बाबतीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या मिरचीला स्थान मिळाले. या मिरचीचे उत्पादन अमेरिकेत घेतले जाते. ही मिरची स्वीट हबनेरो आणि नागा वाइपर मिरची यांच्यामध्ये क्रॉस करुन तयार केली आहे. अनेकदा, कॅरोलिना रीपर मिरची खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा काही घटना समोर आल्या आहेत.
नागा वाइपर
नागा वाइपर मिरची ही खूप चटपटीत असते. त्याची लागवड फक्त युनायटेड किंगडममध्ये केली जाते. या मिरचीचा रंग वेगळा असू शकतो, त्याचा रंग इतर मिरच्यांसारखा लालच असण्याची गरज नाही. ही देखील जगातील सर्वात जास्त तिखट मिरची म्हणून ओळखली जाते.
मिरची खाण्याचे फायदे
हिरव्या मिरचीमध्ये पोटॅशियम, लोह, तांबे, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात. जे आरोग्य आणि त्वचेसाठी आवश्यक आहेत. तसेच यामुळे संधिवात सारख्या वेदनांमध्ये आराम मिळतो. खरे तर त्यात असलेले capsaicin नावाचे संयुग वेदना कमी करणारे म्हणून काम करते. हिरवी मिरची देखील हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हिरवी मिरची नियमित खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी करता येते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश जरूर करा. यामुळे चयापचय वेगवान होते, जेव्हा चयापचय वेगाने होते तेव्हा शरीरात साठलेली चरबी वापरली जाते, आणि सहाजिकच वजन कमी होण्यास मदत होते.