शरद पवार दिल्लीला रवाना, कोल्हापुरातील नियोजित दौरा रद्द | Sharad Pawar

0
189

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे येथे अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार होते. मात्र त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला असून ते दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Sharad Pawar Kolhapur tour cancelled

कोल्हापूरात आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी दौरा रद्द केल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. परंतु शरद पवार कोल्हापूर ऐवजी अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत.