शेवटची संधी: सांगली महानगरपालिकेत 12 वी ते MBBS पात्रताधारकांना नोकरी, त्वरित अर्ज करा | Sangli Mahanagrpalika Bharti 2024

Share Me

सांगली | राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सांगली अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Sangli Mahanagrpalika Bharti 2024) केली जाणार आहे. एकूण 90 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 

या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला, ज़िल्हा परिषद, सांगली- ४१६४१६

Sangli Mahanagrpalika Bharti 2024

पदाचे नावपद संख्या 
वैद्यकीय अधिकारी26 पदे
आरोग्य सेवक (पुरुष)24 पदे
स्टाफ नर्स40 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीM.B.B.S/B.A.M.S.
आरोग्य सेवक (पुरुष)12 th pass in Sciences + Paramedical Basic Training course OR sanitary Inspector course
स्टाफ नर्सGNM/B.Sc Nursing

आवश्यक कागदपत्रे

  • प्रथम विहित नमुन्यात अर्ज.
  • १० वी गुणपत्रक आणि सनद (जन्म तारीख पुरावा म्हणून).
  • १२वी गुणपत्रक आणि सनद.
  • पदवीचे गुणपत्रक (१ ले वर्ष ते अंतिम वर्ष-सर्व Attempt सह- जेणेकरुन एकत्रित गुण काढणे शक्य होईल) व पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)
  • ज्या-त्या शैक्षणिक अर्हतेस/तांत्रीक पदांकरीता संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक अर्हतेची वैद्य असलेली परिषदेकडील तत्सम कौंन्सीलचे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक राहील अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल.
  • पासपोट आकाराचे दोन फोटो.
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
  • राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र.
  • अनुभव असलेस प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे.
  • शासकीय अनुभव असलेस अनुभव दाखला.
  • वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.
  • वयाचा पुरावा म्हणून (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला).
  • नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हिट जोडणे बंधनकारक राहील.

PDF जाहिरातNHM Sangli Miraj Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://sangli.nic.in/


Share Me