मुंबई | रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II पदांसाठी मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 9020 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.
RRB Technician Bharti 2024
जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा या भरती प्रक्रियेमुळे पूर्ण होऊ शकते. जर तुमच्याकडे यासाठी आवश्यक असणारी पात्रता असेल, तर ही तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे.
- वयोमर्यादा –
- तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 36 वर्षे
- तंत्रज्ञ ग्रेड II – 18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- For all candidates – Rs. 500/-
- SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-
या पदांसाठी आवश्यक पात्रता काय?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने 10 वी तसेच ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या शिवाय, इच्छुक उमेदवाराकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
तंत्रज्ञ ग्रेड I | 1100 पदे |
तंत्रज्ञ ग्रेड II | 7920 पदे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तंत्रज्ञ ग्रेड I | 29,200/- |
तंत्रज्ञ ग्रेड II | 19,000/- |
PDF जाहिरात – RRB Technician Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For RRB Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
निवड प्रक्रिया कशी केली जाणार?
रेल्वेतील या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागणार आहे. CBT1 उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला त्यानंतर CBT2 परिक्षेत सहभागी होता यईल.
या CBT2 परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराला वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल. हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पडल्यानंतर उमेदवाराला गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळेल.