Post Office Bharti 2024

10वी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरी, महिना 63 हजार पगार.. संधी चुकवू नका | Post Office Bharti 2024

मुंबई | भारतीय टपाल विभाग सातत्याने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असतो. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेनुसार पोस्ट विभाग अंतर्गत ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) पदाची भरती (Post Office Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाची ही भरती उत्तर प्रदेश सर्कलमध्ये केली जाणार आहे. याठिकाणी अधिसूचनेनुसार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची शेवटची तारीख 42 दिवस आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.

पोस्ट विभागातील उत्तर प्रदेश वर्तुळातील 78 ड्रायव्हर रिक्त जागा (सामान्य श्रेणी) भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. या पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया – स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल.

इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवू शकतात:
व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सेवा कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर- 208001 उत्तर प्रदेश.

PDF जाहिरात – Post Office Bharti 2024
अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in


मुंबई | भारतीय टपाल विभाग अंतर्गत रिक्त पदाची मोठी भरती (Post Office Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 1899 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यावर्षी पुन्हा एकदा टपाल खात्याने ही मेगाभरतीची घोषणा केली आहे.

Post Office Bharti 2023

या भरती अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 आहे. ही भरती स्पोर्टस् कोट्या अंतर्गत केली जाणार आहे.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या 
पोस्टल असिस्टंट598 पदे
सॉर्टिंग असिस्टंट 143 पदे
पोस्टमन 585 पदे
मेल गार्ड03  पदे
मल्टी टास्किंग स्टाफ570 पदे

पदनिहाय शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोस्टल असिस्टंटपदवी
सॉर्टिंग असिस्टंट पदवी
पोस्टमन  12वी
मेल गार्ड12वी
मल्टी टास्किंग स्टाफ10वी

पदनिहाय वेतनश्रेणीचा तपशील

पदाचे नाव वेतनश्रेणी
पोस्टल असिस्टंटRs. 25,500 – 81,100/-
सॉर्टिंग असिस्टंट Rs. 25,500 – 81,100/-
पोस्टमन  Rs. 21,700 – 69,100/-
मेल गार्डRs. 21,700 – 69,100/-
मल्टी टास्किंग स्टाफRs. 18,000 – 56,900/-

PDF जाहिरात – Indian Postal Department Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा  – Apply for Post Office Bharti 2023

अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in

महत्वाच्या सूचना
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Scroll to Top