PMC Recruitment 2024

पुणे महापालिकेत पदवी/पदवीकाधारकांसाठी मोठी भरती; 113 रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू | PMC Recruitment 2024

पुणे | पुणे महापालिकेत रिक्त जागांची भरती (PMC Recruitment 2024) प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीप्रक्रियेतून कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. एकूण ११३ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

मागील वर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीची प्रक्रिया महापालिकेने राबविली होती. त्यासाठी तीन वर्षाच्या अनुभवाची अट असताना देखील सुमारे १२ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केले होते. ही भरती प्रक्रिया पूर्ण करून त्याची प्रतिक्षायादीची मुदत नुकतीच संपली आहे. त्यानंतर आता ११३ जागांची भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेत १३ पदे माजी सैनिक अनुशेष भरून काढण्यासाठी ठेवली आहेत. तर सर्व संवर्गासाठी १०० पदे असणार आहेत. 

PMC Recruitment 2024

कनिष्ठ अभियंतासाठी ३ वर्षांची अनुभवाची अट ठेवली होती. याबाबत बऱ्याच दिवसांपासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवली आहे. पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर १६ जानेवारीपासून उपलब्ध होतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/ (16 जानेवारीपासून संकेतस्थळावर तपशील उपलब्ध होईल)


पुणे | पुणे महापालिकेमध्ये 100 कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत त्याबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, कनिष्ठ अभियंता भरतीसाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून काढण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागानेही त्याला मंजुरी दिल्याची माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे.

महापालिकेने 2014 मध्ये सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली. ही नियमावली मंजूर करताना कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे अनुभवाची बनावट कागदपत्रे उमेदवारांकडून सादर करण्यात आल्याची बाब गेल्या वर्षी कनिष्ठ अभियंता पद भरतीवेळी निदर्शनास आली होती.

लेखी परीक्षेनंतर बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तिघा अभियंत्यांना नोकरीतून मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे अनुभवाची अट काढून टाकण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्याला राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेही तत्त्वत: मंजुरी दिली होती. त्यानंतर आता ही अट काढून टाकण्यात आल्याचे आणि येत्या दहा दिवसात 100 कनिष्ठ अभियंता भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.


पुणे महानगरपालिका अंतर्गत अनुभवधारक उमेदवार पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एस.एम. जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे

PDF जाहिरातPune Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmc.gov.in/


पुणे | पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे अंतर्गत क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महिना रू. 21,840 इतके वेतन मिळणार आहे.

वरील रिक्त पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

शैक्षणिक पात्रता –
Bsc पदवी उत्तीर्ण
वयाची 18 वर्षे पूर्ण,
टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजीमध्ये 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी आणि मराठीसाठी 30 W.P.M.

आवश्यक कागदपत्रे

 • फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
 • जन्म तारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
 • पदवी उत्तीर्ण मार्कशिट
 • टायपिंग प्रमाणपत्र
 • एम.एस.सी.आय.टी. (MSCIT)
 • अनुभव प्रमाणपत्र.
 • जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)

PDF जाहिरातPune Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://pmc.gov.in/


पुणे | पुणे महानगरपालिकेने (PMC) प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती (PMC Recruitment 2023) जाहीर केली आहे.

या भरती अंतर्गत पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांकरिता मुलाखती महिन्याच्या 2, 3, 4 मंगळवार आणि दर गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

पुणे महानगरपालिका भरती 2023 – PMC Recruitment 2023

वयोमर्यादा –

 • प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी – 50 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 55 वर्ष
 • सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी – 45 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 50 वर्ष
 • सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 45 वर्ष.
 • वरिष्ठ निवासी – 45 वर्ष.
 • कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्ष

मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय

PDF जाहिरात Pune Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://pmc.gov.in/


Scroll to Top