HomeCareerनाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती...

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती | Nashik ZP Karmachari Sahkari Bank Bharti 2024

नाशिक | नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Nashik ZP Karmachari Sahkari Bank Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, कम्प्लायन्स ऑफिसर, ई.डी.पी प्रमुख पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2024 आहे.

वयोमर्यादा –

  • मुख्य कार्यकारी अधिकारी – किमान ३५ वर्षे व कमाल ६० वर्षे
  • व्यवस्थापक – ४५ वर्ष
  • कम्प्लायन्स ऑफिसर – ४० वर्ष
  • ई.डी.पी प्रमुख – ३० वर्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सोमा हाईटस्, नविन आग्रा रोड, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक- ४२२ ०११
  • ई-मेल पत्ता – nzspksbk@gmail.com
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी.बँकींग CAIIB / DBF / DCBM परिक्षा पास.चार्टर्ड अकौंटंट (CA), MBA (Finance) असल्यास प्राधान्य
व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी/ MS CIT/JAIIB/CAIIB/DBF/DCM किंवा GDC & A.
कम्प्लायन्स ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.चार्टर्ड अकौंटंट (CA), MBA (Finance) असल्यास प्राधान्य.
ई.डी.पी प्रमुखB.E/B Tech./M.C.S/M.Sc./ B.Sc. (Computer/I.T.)

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2024 आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Nashik ZP Karmachari Sahkari Bank Recruitment 2024

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular