News

MSCE Pune शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध | MSCE Pune Scholarship Exam 2024

पुणे | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत घेतली जाणार आहे. मंडळाने या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले असून, विद्यार्थ्यांनी ते शाळेतून प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य परीक्षा परिषदेने शाळेच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली आहेत. प्रवेशपत्राची प्रिंट काढून सर्व परीक्षार्थ्यांना तत्काळ वितरित करावी, असा आदेश परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी मुख्याध्यापकांना दिला आहे. विद्यार्थी किंवा पालकांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे. 

MSCE Pune Scholarship Exam 2024

या शिष्यवृत्ती परीक्षेतील दोन्ही गटांसाठी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक पेपरसाठी ए, बी, सी, डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. यंदा सुमारे पाच लाख १० हजारांहून जास्त विद्यार्थी पाचवीची, तर तीन लाख ८१ हजारांहून जास्त विद्यार्थी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत.

Back to top button