MPSC लिपिक-टंकलेखक अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी प्रकाशित | MPSC Group C Result 2023

Share Me

मुंबई | महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC https://mpsc.gov.in/downloadFile/english/8089

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 
MPSChttps://mpsc.gov.in/downloadFile/english/8090


MPSC गट-क अंतर्गत 7510 पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी | MPSC Group C Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट-क संवर्गासाठी 7510 पदांची मेगाभरती (MPSC Group C Bharti 2023) केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

MPSC Group C Bharti 2023

याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी 3 नोव्हेंबर 2023 च्या आत अर्ज सादर करावेत.

जाहिरात क्रमांक 001/2023 दिनांक 20 जानेवारी 2023 नुसार आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक 01 सप्टेंबर 2023 व 12 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

यासाठी राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी 3 नोव्हेंबर 2023 च्या आत अर्ज सादर करावेत. हि भरती प्रक्रिया विविध 7510 पदांसाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता –
उद्योग निरीक्षक, गट-क – उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :
– सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
– पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कर सहाय्यक – मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

लिपिक-टंकलेखक – मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

PDF जाहिरात – MPSC Group C Exam Notification 2023
ऑनलाईन अर्ज करा – Maharashtra Public Service Commission Application 2023
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in


Share Me