Sunday, September 24, 2023
HomeCareerMIDC अंतर्गत 802 रिक्त जागांची नवीन भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा |...

MIDC अंतर्गत 802 रिक्त जागांची नवीन भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | MIDC Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील विविध रिक्त पदांच्या जागेसाठी भरती (MIDC Bharti 2023) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत 802 नवीन रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

MIDC Bharti 2023 – यासाठी पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 2 सप्टेंबर 2023 पासून ते दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच आपले अर्ज सादर करावेत.

पदांचा तपशील
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2), वीजतंत्री (श्रेणी-2), पंपचालक (श्रेणी-2), जोडारी (श्रेणी-2), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल) ही पदे भरण्यात येणार आहेत.

  • अर्ज शुल्क –
    •  खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी –  रु.1000/-
    • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.100/-

PDF जाहिरात MIDC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराMIDC Recruitment Apply 2023

अर्ज भरण्यासाठी महत्वाची माहिती
संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीव्दारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा.

तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करु शकतो.

उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील / पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र / गुणपत्रिका / ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरु शकते.

“तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील” (Save & Next बटणावर क्लिक करुन तुमचा अर्ज जतन करा.

फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन (Preview) टॅबवर क्लिक करा.

आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा. (Complete Registration)

“पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट” (Submit) बटणावर क्लिक करावे.


MIDC ची चार वर्षे रखडलेली पदभरती अखेर रद्द | MIDC Bharti

मुंबई | महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे (एमआयडीसी) 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेली सरळसेवा भरती प्रक्रिया आता चार वर्षांनी रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांकडून घेण्यात आलेले 500 रुपये परीक्षा शुल्क परत देण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक एमआयडीसीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सरळसेवा भरती 2019 अंतर्गत गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील एकूण 14 संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार त्यातील 502 पदे ही ऑनलाइन परीक्षेद्वारे तर 363 पदे ऑफलाइन परीक्षेद्वारे भरली जाणार होती. 502 पदांसाठी 20 ऑगस्ट 2021 ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेऊन 15 डिसेंबर 2021 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यातील लघुलेखक संवर्गासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी 30 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर आवश्यक असलेली व्यावसायिक परीक्षा होऊ शकली नाही. अखेरीस ही परीक्षा प्रक्रियाच रद्द करण्यात येत असल्याचे एमआयडीसीने परिपत्रकाद्वारे जाहीर केले. वाहनचालक, शिपाई, मदतनीस, अग्निशमन विमोचक, यंत्रचालक, चालक (अग्निशमन), वीजतंत्री ग्रेड 2, मदतनीस अशा पदांची भरती रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भरती प्रक्रिया रद्द करण्यामागे आकृतीबंध अंतिम नाही, महापरीक्षा संकेतस्थळाचा शासन निर्णय अधिक्रमित होणे, परीक्षा घेण्यासाठीच्या कंपन्यांचे पॅनेल स्थगित होणे अशी कारणे देण्यात आली आहेत. मात्र भरती प्रक्रिया रद्द करताना उमेदवारांनी परीक्षांसाठी भरलेल्या शुल्काच्या परताव्याबाबत परिपत्रकात स्पष्टता देण्यात आलेली नाही. उमेदवारांनी प्रत्येकी पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरले होते. त्यामुळे चार वर्षे प्रतीक्षा करून पदभरती रद्द आणि शुल्क परताव्याचीही स्पष्टता नसल्याने उमेदवारातून संताप व्यक्त केला जात आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular