Artificial Intelligence सध्या सगळीकडे एआय, म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा बोलबाला सुरू आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
AI Career आम्ही तुम्हाला आज एआय संबंधित टॉप करिअर्सची माहिती देणार आहोत. या सर्व क्षेत्रांमध्ये बंपर सॅलरी मिळू शकते.
Data Scientist
सध्याचे जग हे डेटाचे आहे. त्यामुळे डेटा सायंटिस्ट पदावर काम करणाऱ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. AI टूल्सच्या मदतीने क्लिष्ट डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण करण्याचे काम डेटा सायंटिस्टना करावे लागते. या कामातून महिन्याला लाखो रूपयांचा पगार किंवा फ्रिलांसिंग वर्क करून कमाई करता येते.
Machine Learning Engineer
ऑटो काम करणारे सॉफ्टवेअर तयार करणे हे ML इंजिनिअर्सचे काम असते. चॅटबॉट, ट्रॅफिक ओळखणारे तंत्रज्ञान, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स अशा गोष्टी मशीन लर्निंग इंजिनिअर्स कडून केले जाते. या कामातून देखील महिन्याला लाखो रूपयांची कमाई करता येते.
AI Research Scientist
सध्या उपलब्ध असलेल्या एआय मॉडेल्सवर प्रयोग करून नवीन अल्गोरिदम तयार करण्याचे काम AI Research Scientist करतात. हेल्थकेअर, मार्केटिंग, फायनान्स आणि इतर क्षेत्रांमध्ये यांची मोठी मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे यांना महिन्याला लाखो रूपये पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
Robotics Engineer
रोबोटिक्स इंजिनिअर स्वतःच काम करू शकणारे रोबोट तयार करतात. कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स या गोष्टींचा वापर करून हे तयार केले जातात. सध्या अशा प्रकारचे रोबोटिक काम करून घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे Robotics Engineers ना मोठी मागणी आहे.
UX Designer
सामान्य नागरिकांना सहज वापरता यावेत असे प्रॉडक्ट तयार करणे हे यूएक्स डिझाईनर्सचं काम असते. एखाद्या वेबसाईटवर असणारी सर्च प्रोसेस हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. UX Designers ना देखील सध्या चांगली मागणी असून अशा प्रकारचे काम करणाऱ्यांना चांगला पगार दिला जातो.
AI Project Manager
AI Project Manager हे प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स, बिझनेस लीडर्स, डेटा सायंटिस्ट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर या सर्वांमध्ये योग्य ताळमेळ राखला जाईल हे पाहण्याचे काम करतात. यांच्या कामाच्या यशस्वीतेवरच एखादा प्रोजेक्ट यशस्वी होईल की नाही हे ठरते. त्यामुळे AI Project Manager ची सध्या मागणी वाढताना दिसत आहे.