Friday, March 24, 2023
HomeCareerराज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 3 महिन्यात 950 पदांची भरती; TCS कंपनी...

राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 3 महिन्यात 950 पदांची भरती; TCS कंपनी मार्फत होणार भरती | Maharashtra Excise Department Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्राचा राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. यापुढील काळात या विभागाचे उत्पन्न वाढेल आणि रिक्त पदे भरली जातील, यादृष्टीने प्रयत्न करू, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. (Maharashtra Excise Department Bharti 2023)

गेली अनेक वर्षे या विभागात नोकरभरती झालेली नाही, आता नुकत्याच झालेल्या विधिमंडळातील चर्चेत असे सांगण्यात आले कि राज्य उत्पादन विभागात (Excise Dept) पुढील 3 महिन्यात TCS कंपनी मार्फत 950 पदांची भरती करणार आहे. (Maharashtra Excise Department Bharti 2023)

Maharashtra Excise Department Bharti 2023

  • मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात शंभूराजे देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
  • यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, आयुक्त के. बी. उमाप, सहआयुक्त यतीन सावंत तसेच राज्यातील उत्पादन शुल्क विभागाचे सर्व उपायुक्त उपस्थित होते.
  • राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार देसाई यांनी स्वीकारला आहे.
  • यावेळी विभागाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
  • राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला महसुली उत्पन्न मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे.
  • राज्यमंत्री म्हणून या विभागाची जबाबदारी गेली अडीच वर्षे सांभाळल्याने या विभागाचा अनुभव आहे.
  • कोरोनाकाळात विभागाचे उत्पन्न काही प्रमाणात कमी झाले होते, परंतु गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा उत्पन्नवाढ झाली आहे.
  • विदेशी मद्याचे दर कमी केल्याने चोरट्या मार्गाने होणारी विक्री कमी झाली असून यामुळे करात आणि कायदेशीर विक्रीत वाढ झाली असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular