Career

कोल्हापूर महापालिका भरतीच्या आकृतीबंधाला लवकरच मंजुरी? | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

कोल्हापूर | राज्य शासनाकडे एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आकृतिबंधास तत्काळ मंजुरी द्यावी, गरजेनुसार वाढविलेली पदे रद्द करू नयेत. तसेच शासनाकडून परस्पर उपायुक्त व सहायक आयुक्त पदे वाढवण्यात आली असून, ती रद्द करून आकृतिबंधास मान्यता द्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  दिले आहे. याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनाही निवेदन देण्यात आले आहे. 

Kolhapur Mahanagarpalika Bharti : कोल्हापूर महापालिकेचा कारभार सन 1985 च्या आकृतिबंधानुसार सुरू आहे. सध्या प्रभागाची संख्या व नागरीकरण वाढले आहे. सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. मुळातच सन 2000 मध्ये नवीन आकृतिबंध आराखडा मंजूर होऊन अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. शिवाय सन 1985च्या आकृतिबंधानुसार कोल्हापूर मनपा प्रशासनाकडे मंजूर आस्थापनावरील 4761 पैकी 1762 पदे रिक्त आहेत. यातूनही नव्याने पाठविलेला आराखडाही वर्ष झाले तरी मंत्रालयात धूळखात पडून आहेत.

राज्यातील अन्य महापालिकेचा आकृतिबंध मंजूर झाला असताना कोल्हापूर मनपाच्या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. दरम्यान, शासनाने 24 जानेवारीला मनपाने पाठवलेल्या सुधारित आकृतिबंधानुसार वर्ग 3 मधील 180, तर वर्ग 4 मधील 756 पदे रद्द केल्याचे समजते.

वर्ग 3 व 4 मध्ये कार्यरत असलेले कर्मचारी हे बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभाग यासारख्या सेवा देणाऱया विभागात कार्यरत असतात. त्यामुळे त्यांची पदे कमी झाल्यास नागरिकांना मूलभूत सेवा पुरवणे अडचणीचे होणार आहे. असे असताना शासनाने परस्परच तीन ऐवजी पाच उपायुक्त आणि 5 ऐवजी 10 सहायक आयुक्त पदे निर्माण केल्याने आस्थापना खर्चातही वाढ होणार आहे.

Back to top button