News

मोठी बातमी! जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले, मात्र सरकारसमोर ठेवली ‘ही’ अट | Manoj Jarange Patil

जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आपलं उपोषण मागं घेतलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं.  

सरकारला वेळ देण्यास तयार

मनोज जरांगे पाटील यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळाने त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासन दिले. आश्वासनावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण सकारात्मक असल्याचं सांगितलं. सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केले.

सरकारला अजून वेळ वाढवून दिला तर काही फरक पडत नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी 2 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगितलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. 

मराठा आरक्षणाप्रश्नी (Maratha Reservation) राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असं आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Meet Manoj Jarange) यांनी दिलं.

त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो असं जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला.


Back to top button