8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

पदवीधरांना केंद्र सरकारकडून 60 हजार महिना पगाराची ऑफर, ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांसाठी होणार निवड | ITPO Recruitment 2023

मुंबई | वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदांसाठी भरती (ITPO Recruitment 2023) सुरू केली आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 19 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. यासाठी आयटीपीओने अधिसूचनाही जारी केली आहे.

ITPO Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT / कॉम्प्युटर सायन्स) क्षेत्रातील B.E. / B.Tech, 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून किमान 60% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड किंवा दोन वर्षांची पदव्युत्तर पात्रता सरकार / राज्य सरकार / CPSE / स्वायत्त संस्था / विद्यापीठातून दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा / व्यवस्थापनातील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम / एमबीए / अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच संशोधन संस्थेत काम करण्याचा अनुभव असावा.

वेतनश्रेणी : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी निवड होणार्‍या उमेदवारला दरमहा 60 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

वयोमर्यादा : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी अर्ज अरण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

तुम्ही या पदांसाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज करू शकता. अर्जाची PDF फाइल आवश्यक कागदपत्रांच्या डिजिटल फाइल्ससह nsrwatt@itpo.gov.in वर ईमेलद्वारे 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मेल करणे आवश्यक आहे. मेल करताना Mail Subject मध्ये “ITPO मध्ये तरुण व्यावसायिकांसाठी अर्ज” लिहिणे अनिवार्य असेल.

PDF जाहिरात – ITPO Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.indiatradefair.com/ 

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles