Income Tax Department Bharti 2024

सरकारी नोकरी: ‘इन्कम टॅक्स’ विभागात रिक्त जागांची भरती | Income Tax Department Bharti 2024

नागपूर | आयकर विभाग, नागपूर अंतर्गत वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे./ अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर, कक्ष क्रमांक 104, पहिला मजला, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001
ई-मेल पत्ता –nagpur.ito.tech.pccit@incometax.gov.in

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातIncome Tax Department Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://incometaxindia.gov.in/

खुशखबर! आयकर विभागात तब्बल १२ हजार पदांची भरती होणार, तयारीला लागा! Income Tax Department Bharti 2024

मुंबई | आयकर विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Income Tax Department Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. 19 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. 19 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 291 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे.

 • वयोमर्यादा –
  • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) – 18 – 30 वर्षे
  • स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) – 18 – 27 वर्षे
  • कर सहाय्यक (TA) – 18 – 27 वर्षे
  • मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 18 – 25 वर्षे
  • कॅन्टीन अटेंडंट (CA) – 18 – 25 वर्षे
पदाचे नावपद संख्या 
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)14
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो)18
कर सहाय्यक (TA)119
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)137
कॅन्टीन अटेंडंट (CA)03

या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक पदासाठी शिक्षणाची अट ही वेगळी असणार आहे. दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. अर्ज करण्यासाठी https://incometaxmumbai.gov.in/ या साईटवर तुम्हाला जावे लागेल.

पदाचे नाववेतनश्रेणी
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)Level 7 (Rs.44,900-1,42,400)
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो)Level 4 (Rs.25,500-81,100)
कर सहाय्यक (TA)Level 4 (Rs.25,500-81,100)
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)Level 1 (Rs.18,000-56,900)
कॅन्टीन अटेंडंट (CA)Level 1 (Rs.18,000-56,900)

PDF जाहिरातIncome Tax Department Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराhttps://mumbai-itax.com/
अधिकृत वेबसाईटhttps://vvww.incometaxmumbai.gov.in/

https://incometaxmumbai.gov.in/ वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 असावे तसेच उमेदवाराचे वय हे 30 च्या पुढे नसावे. या भरती प्रक्रियेत मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाईल.


आयकर विभाग, राजस्थान अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Income Tax Department Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 तसेच मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. 16 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. 16 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे. 

या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक पदासाठी शिक्षणाची अट ही वेगळी असणार आहे. दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. अर्ज करण्यासाठी incometaxrajasthan.gov.in या साईटवर तुम्हाला जावे लागेल. incometaxrajasthan.gov.in वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 असावे तसेच उमेदवाराचे वय हे 30 च्या पुढे नसावे. या भरती प्रक्रियेत मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाईल.

Scroll to Top