देशातील विविध सरकारी बँकामध्ये मेगाभरती, जाणून घ्या सर्व बँकामधील भरतीचा तपशील | Govt. Bank Job 2024

Share Me

मुंबई | सरकारी बँकामध्ये नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. बँकामध्ये नोकरी (Govt. Bank Job 2024 ) शोधणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण देशातील विविध नामांकित सरकारी बँकामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती केली जात आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक अशा विविध बँकाचा समावेश आहे.

स्टेट बॅक ऑफ इंडिया भरती 2024

स्टेट बँक ही देशातील सार्वजनिक बँकामधील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया’ झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांमध्ये समाविष्ठ आहे. अशा अग्रणी बँकेत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

स्टेट बँकेत सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक या विविध पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

PDF जाहिरात 1 – SBI Recruitment 2024
PDF जाहिरात 2 – SBI Recruitment 2024
PDF जाहिरात 3 – SBI Recruitment 2024
Online Application – Apply For SBI Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://bank.sbi/
सविस्तर माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा –

Recent Articles

स्टेट बँकेत विविध शाखेतील पदवीधरांना नोकरीची संधी; 131 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | State Bank Bharti 2024


आयडीबीआय बँक भरती 2024

 इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात IDBI बँक अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती (IDBI Bank Bharti 2024) जाहिर करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 540 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यामध्ये ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदाच्या 522 जागा तर बँक वैद्यकीय अधिकारी पदाच्या 18 जागांचा समावेश आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आणि 07 मार्च 2024 आहे.

PDF जाहिरात – IDBI Bank Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा (ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर)  Online Apply For IDBI Bank Recruitment 2024
PDF जाहिरात (वैद्यकीय अधिकारी) – IDBI Bank Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा –

Recent Articles

IDBI बँकेत विविध पदांसाठी मेगाभरती; कोणत्याही शाखेतील पदवीधरांना संधी, 540 रिक्त जागा | IDBI Bank Bharti 2024


पंजाब नॅशनल बँक भरती 2024

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरतीची (Punjab National Bank Bharti 2024) घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 1025 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-फॉरेक्स, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.

PDF जाहिरात – Punjab National Bank Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For PNB Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/
अधिक माहितीसाठी ही लिंक क्लिक करा –

Recent Articles

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 रिक्त जागांची भरती, पगारही लाखात; संधी चुकवू नका | Punjab National Bank Bharti 2024


युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024

बँकींग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी (Union Bank Of India Bharti 2024) उपलब्ध झाली आहे. कारण देशातील अग्रगण्य युनियन बँक ऑफ इंडियाने मेगाभरतीची घोषणा केली आहे. युनियन बँकेने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 606 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

PDF जाहिरातUnion Bank of India Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Union Bank of India
अधिकृत वेबसाईटhttps://www.unionbankofindia.co.in/

Recent Articles

Any Graduate उमेदवारांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 पदांकरिता मेगा भरती; 90 हजारपर्यंत मिळेल पगार | Union Bank Of India Bharti 2024


सरकारी बँकेतील नोकरी का सर्वांना हवी असते?

सरकारी बँकेतील नोकरी अनेकांसाठी स्वप्नातील नोकरी असते. यामागे अनेक कारणे आहेत:

  1. सुरक्षितता आणि स्थिरता: खाजगी क्षेत्रात नोकरीची अस्थिरता असते, तर सरकारी बँकेतील नोकरी अत्यंत सुरक्षित आणि स्थिर मानली जाते.
  2. चांगले वेतन आणि फायदे: सरकारी बँका चांगले वेतन आणि अनेक फायदे देतात, जसे की पेन्शन, वैद्यकीय विमा, गृहनिर्माण कर्ज इत्यादी.
  3. सामाजिक प्रतिष्ठा: सरकारी बँकेतील नोकरीला समाजात चांगली प्रतिष्ठा आहे. अशा नोकरीवर असलेल्या व्यक्तीकडे आदराने पाहिले जाते.
  4. कमी कामाचा ताण: सरकारी बँकेतील कामाचा ताण खाजगी क्षेत्रातील बँकांपेक्षा कमी असतो.
  5. करिअरच्या प्रगतीची संधी: सरकारी बँकांमध्ये करिअरच्या प्रगतीसाठी अनेक संधी उपलब्ध असतात.
  6. सरकारी नोकरीचे फायदे: निवृत्ती वेतन, वैद्यकीय सुविधा, शिक्षण शुल्क सवलत इत्यादी.
  7. देशसेवेची भावना: सरकारी बँकेत काम करून देशाच्या विकासात योगदान देण्याची भावना अनेकांना आकर्षित करते.
  8. कौटुंबिक सुरक्षा: सरकारी बँकेतील नोकरीमुळे कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता निश्चित होते.

इतर कारणे:

  • सरकारी बँकेतील परीक्षा स्पर्धात्मक असतात, त्यामुळे यशस्वी होणाऱ्यांना बुद्धिमान आणि हुशार मानले जाते.
  • सरकारी बँकेतील नोकरीमुळे देशभरात बदलीची शक्यता असते.
  • अनेक लोकांना सरकारी नोकरीमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यायचा असतो.

वरील सर्व कारणांमुळे सरकारी बँकेतील नोकरी अनेकांना हवी असते.
टीप: हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सरकारी बँकेतील नोकरी मिळवणे सोपे नाही. त्यासाठी कठोर परिश्रम आणि अभ्यास आवश्यक आहे.


Share Me