Career

आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ तसेच इतर विविध पदांची भरती; 45 रिक्त जागा | Government Bharti 2024

पणजी | आरोग्य सेवा संचालनालय, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Government Bharti 2024 ) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 45 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर जागांच्या भरतीबाबत सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका, अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

Government Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा

शैक्षणिक पात्रता
सल्लागार – इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी – इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे.

अधीक्षक परिचारिका – बी. एस्सी नर्सिंग सोबत या व्यवसायातील किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा
अनिस्थेसिया – मान्यताप्राप्त संस्थेतून बैचलर ऑफ सायनस इन अनेस्थेसिया टेक्नोलॉजी ही पदवी प्राप्त केलेली असावी.
स्टाफ परिचारिका – बी. एस्सी नर्सिंग। जीएनएम नर्सिंग पूर्ण केलेले असावे. गोवा नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असावी.

पदाचे नाववेतनश्रेणी
सल्लागाररु. २,००,०००/-
वैद्यकीय अधिकारीरु. ७५,०००/-
अधीक्षक परिचारिकारु. ४०,०००/-
अनिस्थेसियारु. ३०,०००/-
स्टाफ परिचारिकारु. ३०,०००/-

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Goa Arogya Vibhag Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://dhsgoa.gov.in/

Back to top button