पणजी | वीज खात्यात सर्वाधिक १ हजार २६१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. २०२२ पासून ही पदे रिक्त आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत लेखी स्वरूपात दिली. आमदार वेंझी व्हिएगश यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता.
वीज खात्यामध्ये मुख्य अभियंत्याच्या पदापासून कनिष्ठ अभियंते, सहायक अभियंते, लाईनमन, वायरमन, चालक, एलडीसी, शिपाई व अन्य पदे रिक्त आहेत. पण अद्याप या पदांसाठी खात्याने कोणत्याही प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली नाही. २०२२ पासून या पदांसाठी जाहिरात आलेली नाही. आता या पदांसाठी जाहिरात आली तर ही पदे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील, असे संकेतही मंत्री ढवळीकर यांनी दिले आहेत.
Goa Electricity Department Bharti 2024
दरम्यान, वीज खात्याप्रमाणे अन्य विविध खात्यांमध्येही रिक्त पदे आहेत. पण बहुतांश पदे ही कंत्रटी तत्त्वावर किंवा तात्पुरती पदावर भरली जात आहेत. तर काही काही खात्यांमध्ये सोसायटीमार्फत कामगारांना घेतले जात आहे. सार्वजनिक बांधकाम, वीज, पोलिस या खात्यांमध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. दरम्यान, राज्यातील बेरोजगारी समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध उद्योग गोव्यात आणले जात आहेत. तसेच काही योजनांच्या माध्यमातून युवकांना सक्षम बनविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.
रिक्त पदे
लाईन हेल्पर : ४९५
सहा. लाईनमन / वायरमन : १११
चालक : १२७
कनिष्ठ अभियंता : ६१
सहा. अभियंता :३८
एलडीसी : ३४
मीटर रिडर : २४
शिपाई : ३७