कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे 146 रिक्त जागांसाठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | ESIC Recruitment 2024

0
186

मुंबई | कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत प्राध्यापक, विशेषज्ज्ञ, वरिष्ठ निवासी आणि शिक्षक पदांसाठी अर्ज (ESIC Recruitment 2024) मागवण्यात येत आहेत. यासाठी पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेत 146 रिक्त जागांची पदे भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांची भरती ही मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. मुलाखत 29, 30 आणि 31 जानेवारी, तसेच 1, 2, 3, 5, 6, 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल. उमेदवारांची रिपोर्टिंग वेळ मुलाखतीच्या दिवशी सकाळी 9 ते 10 :30 अशी आहे.

ज्या उमेदवारांना सदर रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यानी याबाबतची सविस्तर अधिसूचना वाचणे गरजेचे आहे. अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासून मग अर्ज करावेत. खालील पीडीएफ व्दारे याबाबतची अधिसूचना तुम्हा पाहू शकता.

ESIC Recruitment 2024 : निवड प्रक्रिया: निवड मंडळासमोर मुलाखतीत उमेदवाराची निवड त्याच्या कामगिरीच्या आधारावर केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीची ऑफर मिळाल्यानंतर त्यांना कामावर रुजू व्हावे लागेल.

अर्ज शुल्क : सर्व श्रेणींसाठी अर्जाची फी ₹500/- आहे. SC/ST/महिला उमेदवार, ई-सर्व्हिसमन आणिशारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

मुलाखतीचे ठिकाण शैक्षणिक ब्लॉक, ESIC मेडिकल कॉलेज, सनाथनगर, हैदराबाद आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार ESIC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

PDF जाहिरात – ESIC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/


कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत ज्येष्ठ निवासी, अर्धवेळ / पूर्णवेळ विशेषज्ञ, अर्धवेळ / पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 आणि  30 जानेवारी 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, 5 वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल, भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल कांदिवली परिसर, आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्येष्ठ निवासीMBBS with PG, MD, DNB, Diploma in concerned specialty from recognized university
अर्धवेळ / पूर्णवेळ विशेषज्ञM.D, D.M Registration with MCI/State Medical Council or Equivalent with post PG Experience of 3 Years or PG Diploma having post PG experience of 5 year respectively in particular specialty
अर्धवेळ / पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्टM.D, D.M Registration with MCI/State medical Council or equivalent with post PG experience of 03 years or PG Diploma having post PG experience of 05 years respectively in particular specialty

PDF जाहिरात – ESIC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/