2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

Career Guidance : ‘हे’ कॉम्प्युटर कोर्स करतील तुमचं करिअर सेट, मिळेल महिन्याला लाखो रूपये पगार

आज सर्वत्र कॉम्प्युटरचा बोलबाला आहे. जगभरातील डिजिटल क्रांतीमुळे घरापासून ऑफिसपर्यंत सर्व कामे कॉम्प्युटरच्याच माध्यमातून होत आहेत. म्हणूनच सध्याच्या घडीला जगभरात कॉम्प्युटर क्षेत्रातील करिअरला चांगले दिवस आले आहेत. कॉम्प्युटर क्षेत्रातील करिअरचा विचार करता सरकारी तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. म्हणूनच आज आम्ही आपल्या कॉम्प्युटर क्षेत्रातील काही महत्वाच्या करिअर कोर्सेस बद्दल माहिती देणार आहोत.. चला तर जाणून घेऊया..

व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन – VFX and Animation

व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन – जर तुमच्याकडे क्रिएटिव्हीटी असेल आणि कॉम्प्युटर शिकण्याची इच्छा असेल, तर व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. आजच्या काळात अ‍ॅनिमेशन प्रोफेशनल्स आणि आर्टिस्ट लोकांना जगभरात खूप मागणी आहे. चित्रपट इंडस्ट्रीत देखील अ‍ॅनिमेशनची चलती आहे. हॉलिवूडसह बॉलिवूड तसेच विविध चित्रपट इंडस्ट्रीत अ‍ॅनिमेशनपट बनवले जात आहेत. त्यामुळे चित्रपट उद्योगात, गेमिंग उद्योगात अ‍ॅनिमेशन आर्टिस्ट आणि प्रोफेशनल्सना खूप मोठी मागणी आहे. यासाठी तुम्हाला 5 महिन्यांचा शॉर्ट टर्म कोर्स किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा देखील करून तुमच्या करिअरला आकार देता येतो.

वेब डिझायनिंग – Web Designing

वेब डिझायनिंग – सध्याच्या घडीला नोकरीच्या दृष्टीने हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. वेब डिझायनिंग केल्यानंतर, तुम्हाला मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये थेट ऑफर मिळू शकतात. तसेच सध्या सर्वच क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना त्यांची स्वतःची ओळख आणि व्यवसायाची माहिती देणारी वेबसाईट गरजेची आहे. त्यामुळे वेब डिझायनर्सना खूप मागणी आहे. या कोर्समध्ये JavaScript, PHP, HTML इत्यादी कोडिंग भाषांचा अभ्यास समाविष्ट आहे. Web Designing मध्ये करिअर करायचे असल्यास यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स करू शकता. तसेच यामध्ये शॉर्ट टर्म 3 ते 6 महिन्यांचे देखील कोर्स करता येतात. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचे काम सुरू करू शकता किंवा कोणत्याही कंपनीत काम करू शकता.

टॅली – Tally

टॅली : टॅली तज्ज्ञांच्या डिमांडमुळे टॅली कोर्सलाही सध्या मोठी मागणी आहे. हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही संस्थेतून शिकण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते ऑनलाइन देखील शिकू शकता. व्यवसाय सल्लागार, एजन्सी, शैक्षणिक संस्था खाजगी किंवा सरकारी, औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक लेखा फर्म, धोरण नियोजन, परदेशी व्यापार, बँका, बजेट नियोजन, यादी नियंत्रण, व्यापारी बँकिंग अशा विविध क्षेत्रात लेखापाल, वित्त व्यवस्थापक, ऑपरेशन व्यवस्थापक, खाते कार्यकारी, आर्थिक विश्लेषक, कार्यकारी सहाय्यक, चार्टर्ड अकाउंटंट इ. कामासाठी टॅलीचा कोर्स महत्वपूर्ण ठरतो. त्यामुळे टॅली कोर्स केल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी असून 3 ते 4 महिन्यांचा कोर्स करून तुम्ही चांगल्या आर्थिक कमाईची संधी मिळवू शकता.

डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स – Diploma in Computer Science 

डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स : यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स आणि प्रोग्रामिंग यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अनेक नामांकित महाविद्यालये आणि संस्था हा कॉम्प्युटर सायन्स कोर्स देतात. हे केल्यानंतर तुम्हाला नोकरीचे चांगले पॅकेजही मिळू शकते. जर तुम्हाला संगणक विज्ञानाच्या कोणत्या शाखेला प्राधान्य द्यावे याबद्दल खात्री नसल्यास, डिप्लोमा प्रोग्राम तुम्हाला संगणक विज्ञानातील मूलभूत ज्ञान मिळविण्यात मदत करू शकतो. तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबित्वामुळे उद्योगात कुशल आणि पात्र व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. डिप्लोमा प्रोग्राम विविध उद्योगांमध्ये विविध प्रकारचे करिअर पर्याय उघडून देतो.

IT डिप्लोमा – IT Diploma

IT डिप्लोमा : IT डिप्लोमा हा 12वी नंतरचा सर्वोत्तम कॉम्प्युटर कोर्स आहे. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये नोकरीच्या प्रचंड संधी आहेत आणि वेतनही चांगले मिळते. बीटेक केल्यावरच या क्षेत्रात नोकरी मिळते, असा काही लोकांचा गैरसमज आहे. परंतु जर तुम्ही आयटी मध्ये सायबर सिक्युरिटी डिप्लोमा, नॅनो टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा सर्टिफेकट कोर्स, क्लाउड कंप्यूटिंग असे पर्याय निवडून शिक्षण घेतल्यास महिना लाखो रूपयांच्या पगाराची नोकरी सहज मिळवू शकता.

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles