अहमदनगर | अहमदनगर येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळावा 23 जुलै 2023 रोजी घेतला जाणार आहे. (Ahmednagar Job Fair 2023)
येथे ‘पेंटर, ग्राइंडर, फिटर, सीएनसी ऑपरेटर, फील्ड ऑफिसर, एजन्सी मॅनेजर, एजन्सी पार्टनर, सल्लागार, शिकाऊ उमेदवार, प्रशासक, ड्रायव्हर, शिपाई, वसुली अधिकारी, लेखापाल, रेडिओ जॉकी, शिक्षक, परिचारिका, सल्लागार, केस मॅनेजर, स्टोअर असिस्टंट’ पदांची भरती केली जाणार आहे.
याकरिता “शासन आपल्या दारी” अभियानाअंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा अहमदनगर आयोजित करण्यात आलेला आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. (Ahmednagar Job Fair 2023)
या मेळाव्या अंतर्गत 204 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी इच्छूकांनी rojgar.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी, तसेच पदभरतीचा अधिक तपशील पाहण्यासाठी अहमदनगर रोजगार मेळावा ही लिंक तपासावी.