Career

आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत 145 रिक्त जागांची भरती; थेट लिंक द्वारे अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2023

मुंबई | आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 145 रिक्त जागांची भरती केली जाणार असून याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2023

अधिसूचनेनुसार उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
    • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-

PDF जाहिरातAdivasi Vikas Vibhag Thane Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Adivasi Vikas Vibhag Thane Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://tribal.maharashtra.gov.in/

Back to top button