Govt SchemeAgricultureNews

PM Kisan Yojana : 20वा हप्ता ऑगस्टच्या ‘या’ तारखेला मिळणार, पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीतून होणार वितरण

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर ‘Beneficiary Status’ तपासावा.

नवी दिल्ली | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 20वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मतदारसंघ वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून या हप्त्याचे वितरण एका विशेष कार्यक्रमातून करतील.

या योजनेअंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत 19 हप्त्यांद्वारे सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

यंदा सरकारने पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) आणि आधार-बँक खाते लिंकिंग अनिवार्य केली आहे. त्यामुळे चुकीची माहिती दिल्यास हप्ता थांबू शकतो.

तुमच्या खात्यात हप्ता आला का? जाणून घ्या अशा पद्धतीने:

  1. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. आधार क्रमांक, मोबाइल नंबर किंवा बँक खात्याचा तपशील भरा.
  4. Get Data’ क्लिक करताच हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल.

जर “Payment Success” असा मेसेज दिसला, तर तुमचं पेमेंट यशस्वीरित्या झालेलं आहे. अन्यथा, “e-KYC अपूर्ण”, “चुकीचे बँक तपशील” किंवा “आधार लिंक नाही” अशी कारणं दिसू शकतात.

काय लक्षात ठेवायचं?

  • हप्ता मिळवण्यासाठी e-KYC लवकरात लवकर पूर्ण करा.
  • तुमचे जमीन आणि बँकेचे तपशील अचूक आणि अद्ययावत ठेवा.
  • हप्ता थेट DBT प्रणालीने खात्यात जमा केला जातो, त्यामुळे कोणत्याही गैरप्रकारापासून सावध राहा.
  • हप्ता न मिळाल्यास आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

शेतकऱ्यांनी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवावा, असं आवाहन कृषी मंत्रालयाने केलं आहे.

Sakshi Suryawanshi

साक्षी यांनी संगणक शाखेतील (BCA) पदवी संपादन केली आहे. मात्र पत्रकारितेची आवड असल्यामुळे 2021 पासून त्या Lokshahi.News सोबत कार्यरत आहे. Lokshahi News मध्ये माहितीची शहानिशा, विविध स्रोतांमधून आलेल्या बातम्यांचे विश्लेषण, तसेच योग्य प्रकारे संपादन व प्रसिद्धी यावर त्या लक्ष केंद्रित करतात.
Back to top button